• Tue. Oct 27th, 2020

श्रावणातला पाऊस


श्रावणातील पाऊस म्हणजे अंगावर घ्यावासा वाटणारा पाऊस असतो.ऊन सावलीचा खेळ आणि त्यात पडणारा श्रावणी पाऊस एक वेगळाच आनंद देऊन जातो. श्रावणातील आनंद लिहून सांगण्यापेक्षा स्वतः जास्त अनुभवून समजू शकतो.
   श्रावणातील पाऊस खरे तर ऊन सावलीचा खेळ असतो.शांत असा पडणारा हा पाऊस अंगाला एक सुंदर असा स्पर्श करून जातो जो प्रत्येकाला हवाहवासा असतो.श्रावणातील पाऊसाचा खरा खेळ खेड्यात अनुभवण्याची वेगळीच मजा असते.खान्देशात अशा पाऊसाची मजा आणि कोकणातील पुण्यातील असल्या रिमझिम पाऊसाची मजा खूपच फरक आहे.खान्देशात कौलारू घरे नसतात. धाब्याची घरे आणि ह्या धाब्यांवर जाऊन पाऊसाची मजा वेगळीच असते.लहान पनी आम्हाला सांगितलं जायचं ऊन सावलीच पाऊस म्हणजे नागा पाऊस. आम्ही जोरजोरात ओरडून ह्या नाग्या पाऊसाच स्वागत करायचो.धाब्यांवर जाऊन भेभान होऊन नाचायचो.शाळेत जाताना पाऊस आला तर छत्री घेऊन त्याला उत्तर देत असायचो.आषाढातील पाऊस धोधो करून आम्हाला झोडपलेला बघतलाय. त्याला छत्रीचे उत्तर चालत नसे. पण आषाढातील पाऊसाने शाळेत न जाण्याचा बहाणाच मिळे.जुनच्या पहिल्या पाऊसात घरचेच आवर्जून भिजायला सांगायचे. कारण पहिल्या पाऊसात उन्हाळ्यातील गरमी आणि त्यातला हा पहिला पाऊस त्याची आक्रमकता ह्याने तर अंगावरील सर्व घाम पुळ्या नष्ट व्हायचा असा समज आहे.
      आपण नुकतेच आषाढातील मुसळधार पावसाच्या तडाख्यातून वाचलेले असतो. आठ-आठ दिवस हा पाऊस मुक्काम ठोकून असतो.ना धड घराबाहेर पडत येईना कि कामावरून घरी येता येईना अशी अवस्था आषाढाच्या पाऊसात झालेली असते.श्रावण मास आला कि असली काळजी करायची गरज नसते. श्रावणात छत्रीची हि आवशकता नसते. छत्रीचा भार डोक्यावरून जातो.छत्री विसरली तरी चालते. आषाढातील मुसळधार पाऊस असला कि अंगावरच येतो तर श्रावणातील पाऊस अंगावर घ्यावासा वाटतो.पाउसानंतरचा आकाशातील इंद्र धनुष्य डोळ्यांचे पारणे फेडतो.उन्हाळ्यातील तहानलेली झाडे आषाढाच्या पाऊसात तृप्त होतात.मातीचा तो सुगंध हवा हवासा वाटतो.आषाढातील पाऊस म्हणजे सर्वीकडे हिरव्या रंगाची उधळणंच असते.सकाळ अतिशय प्रसन्न असते.हवेत हि गारवा येतो.आकाशात इंद्र धनुष्याच्या रंगाची बरसात झाली कि समजावे श्रावण आला.
    श्रावणातल्या पावसाचं सुंदर वर्णन निसर्गकवी बालकवींनी आपल्या काव्यात अतिशय रेखीवपणे व वास्तव केले आहे. ते म्हणतात,
‘श्रावणमासी हर्षमानसी
हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात पिवळे ऊन पडे’
पशुपक्षी तृप्त होऊन आनंदाने नाचत असतात. म्हणून बालकवी म्हणतात, श्रावणात हिरवळीसारखाच हिरवा हर्ष मनात दाटलेला असतो. अशावेळी पावसाचा सुंदर खेळ सुरू असतो. एखाद्या लपंडावासारखी कधी हळूच सर येते तर कधी हळूच ऊन येते. ते लपाछपी खेळत असताना कधी उन्हात पाऊस पडतो, तर कधी पावसात ऊन पडते, पाऊस वेडा असतो म्हणून श्रावणात पावसाचं घर उन्हात बांधत असावेत किंवा आषाढात पाऊस माणसाला झोडपतो म्हणून निसर्ग श्रावणात पावसाचं घर उन्हात बांधीत असावा.
 श्रावणा तील सरी सारखा
तू हळुवार येशील का?
ऊण पाऊसा खेळ माझ्याशी
तू खेळशील का?
माझ्या स्वप्नांना 
खरे करशील का?
सांग ना 
माझा श्रावण पाऊस होशील का?
प्रेमीही श्रावणात इंद्र धनुषी रंग बरसत असतात.प्रेमिकेला प्रेमी श्रवणासारखा हवा आहे.ऊन पाऊसाचा खेळ खेळणारा हवा आहे. पुण्यात तर प्रेमी खूपच कवितेत बोलणारे असतात.खर सिंहगडावर निसर्गाचे पाऊसातिल रूप अनुभवण्यासाठी प्रेमीप्रेमिका जात असतात. 
विरेंद्र सोनवणे8888244883

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *