• Mon. Oct 26th, 2020

आमदार चोर भाजप

Byadmin

Jul 22, 2020 ,

भाजपला जनतेनं विश्वास दाखवत सत्तेत आणलं . जनतेच्या विश्वासात पात्र ठरण भाजपची नैतिक जबाबदारी आहे.पण कुठेतरी भाजप आपली मुल्य सोडून वागत आहे अन प्रश्न येतो नक्की भाजप आहे की कॉंग्रेस कारण अटलजींची भाजपा राहीलेली नाही अन अशी दोन तीन उदाहरण आपण लेखात बघणारच आहोत अन निर्णय तुमच्यावर वाचकांवर सोडतो खरच पुर्वीसारखी अटलजींची भाजपा आहे की भाजप आमदार चोर आहे? गोवा ,कर्णाटक, राजस्थान मध्यप्रदेश अन इतर राज्यात भाजप कॉंग्रेसचे आमदार फोडत आहे .फोडा अन राज्य करा ही इंग्रजांची निती कॉंग्रेसने अवलंबली आता भाजप ही ह्याच नितीवर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतोय.कॉंग्रेस सोडून भाजपात येणारा आमदार नक्कीच निस्वार्थ नसेल मग तो नंतर भाजपलाही दगा फटका देऊ शकतो.विचारसरणीचा कधी विचारच होत नसेल तर विचारांची लढाई लढणारे नक्की विचार जिंकावा म्हणून लढताय की फक्त सत्तेसाठी लढाई लढली जातेय .मग राम मंदीरासारखी इतर मुद्दे आलेच जे कधीच सुटू द्यायचे नसतात तर त्याच राजकारण करायच असतं.विचारांची लढाई फक्त कार्यकर्त्यांनी लढाईची शेवटी सत्तेसाठी पैसा घेवून पक्ष प्रवेश द्यायचा अन विचारांना केराची टोपली दाखवायची.मला पडलेल कोडं आहे रातोरात येवढ्यावर्षांपासूनचे विचार कसे एकदम बदलतात? की फक्त सत्तेसाठी खोटेपणा आणायचा अन राजकारणाच वातावरण बघून पक्ष बदल करायचा.मग बाकी प्रश्न तसेच राहतात.ते काल पर्यंत जो विरोधात होता तो आज नवीन विचार घेवू एकदमच जादू झाल्यासारखा डाव्या विचारांचा उजव्याविचारांना योग्य मानतो तर उजव्या विचारसरणी वाला डाव्यांना योग्य मानतो.खरतर दोघगी विरुद्ध प्रवाहातील आहेत मग हे अचानक कसे बदलतात कुठला देव येतो विचार बदलायला.की विचारांची लढाई विचारांची नसून सत्तेसाठी आहे अस म्हणाव.कारण एकूण परीस्थीती बघता संघ विचारांना एवढी वर्ष विरोध करणारे अचानक कसे बदलले? जर बदल घडत असेल तर नक्की योग्य अन तो जर निस्वार्थ होत असेल तर सोन्याहून पिवळे पण स्वार्थासाठी नाराजी दूर करण्यासाठी हे बदल कितपत योग्य ? संघ काय ? संघ विचारसरणी काय ? अन संघातील काही लोक बाहेर येऊन राजकारणाची गरज लक्षात घेवून राजकारणात यावं असा विचार करु स्वतंत्र असा जनसंघ स्थापन झाला हे सर्वानाच माहीत आहे हा वटवृक्ष येवढा मोठा होईल याची कल्पनाही केली गेली नसेल ? असो मेहनतीला फळ येतच ? पण आज सर्व दूर संघाला सोन्याचे दिन असताना बाहेरील लोकांची आवश्यकता का भासत आहे? जरी बाहेरचे भाजपात आले तरी ते संघ विचार स्विकारतील का? जर यांना घेताना संघाने काहीतरी नक्कीच उपाय योजना केल्या असतील यात शंका नाही पण वेळ निघून गेल्यावर हीच मंडळी कामी येतील संघ मानतील? खुप मोठ्या प्रमाणातील भाजपातील प्रवेश नक्की योग्य की अयोग्य याचा फायदा आता होत असला तरी तो काही काळापुरताच आहे हे संघ नक्की ओळखुन असेन ? संघ मार्गदर्शन आहे तोपर्यंत भाजपलाही भिती नाही पण संघ विचारसरणी सोडून काही पाऊल भाजप टाकत असेल तर नक्कीच मोठा धोका आहे.अटलजींचा फोटो भाजप वापरत  तो त्यांचा अधिकार आहे पण नुसता फोटो वापरुन काय उपयोग त्यांचे गुण कोण घेणार .अटलजींनी सत्तेसाठी कधी घोडेबाजार केला नाही आज ही अटलजींची भाजपा आमदार पळवतेय घोडेबाजार करतेय.जनता जनार्दनच्या मताला ह्या असल्या घोडेबाजारामुळे महत्व राहत नाही.मग जनतेच्या मताला किंमत उरली नाही तर मग लोकशाही टिकेल .अटलजींनी लोकशाहीला किती महत्व दिल हे त्यांच एक मतासाठी पराभूत सरकारच हाच लोकशाहीचा आदर पण सत्तेच्या लोभात भाजपा हे सारं विसरतेय.आमदार चोरतेय अशी चोर भाजपा नक्कीच अटलजींची आहे हाच मोठा प्रश्न आहे.शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे नेते अन स्वराज्याचे राजे होते त्यांच राजकारण अन त्यांची राज्यशाही नव्हती तर लोकशाही होती कारण राज्यावर रयताचा अधिकार होता रयतेला नेहमी डोळ्यांसमोर ठेवूनच निर्णय होत होते.शिवसुर्यापासून  अस अखंड तेजस्वी अन कायम नवतेज मिळत राहो.आजही हा शिवसुर्य कायम लख्ख प्रकाश देतोय अन अज्ञानरुपी अंधार नष्ट होतोय.पण नवसत्तेतील ह्या भाजपला फक्त शिवाचे आशीर्वाद हवेत शिवसुर्यचा तेज त्याचे कुठलेच गुण आत्मसात करायचे नाहीत असच दिसतय.राजकारण शिकावे तर शिवबा कडून रयतेच्या मागण्याकाय रयतेला कस सुखी करावं हे शिकाव शिवसुर्य शिवबाकडून.भाजप कॉंग्रेस होतेय कॉंग्रेस नामशेष होतेय.हे मात्र लोकशाहीला धरुन नाही.Virendra Sonawane Jalgaon8888244883

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *