• Tue. Oct 27th, 2020

धर्मनिरपेक्ष शिवसेना अन हिंदुत्व

shivsena


शिवसेनेचा  २० वर्षानंतर मुख्यमंत्री झालाय यात चांगली गोष्ट जरी असली तरी ते कुणाबरोबरीन सरकार स्थापन करत आहेत हि महत्वाची बाब आहे. शिवसेना स्थापन झाल्यापासून तर आजतागायत हिंदुत्वावर अडून असलेली सेना अचानक काय होत अन धर्मनिरपेक्ष होते.एका मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्व पणाला लावलाय सेनेन पण ज्यांच्या बरोबर तुम्ही सत्तेत आहात ते तर भ्रष्टाचारी अन स्वार्थी लोक आहेत. हे लोक नक्कीच सेनेचा वापर करून घेतील अन वेळ अली कि सेनेला बाहेर काढतील. मग सेनेला मतदारांजवळ जाताना कुठली विचारसरणी घेऊन जाल. खर तुमचं राजकारण आज संपलय तुमच्या जीवावर तुमचा बळी देऊन हे पापी लोक सत्तेत आलेच आहेत त्याबरोबर स्वतःच्या पक्षाचं नवसंजीवनी मिळवतील. मग सेना ना घर का ना घाट का ! अशी अवस्था सेनेची होईल.
        उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अन त्यांनी पहाच निर्णय घेतला तो म्हणजे आरेचा म्हणजे कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन ५००० कोटींचा सरळ सरळ फायदा करून घेतलाय असा म्हणणं काही वावगं ठरणार नाही. खर तर आज सत्तेत जर सेना आली असेल तर अशाच पद्धची मंदावली करण्यासाठी आली आहे. भाजप सेनेला एक रुपयाही खाऊ देत नव्हती अन स्वतःही खात नव्हती तेव्हा त्यांच्या विरोधात जाऊनसत्ता स्थापन केली. याच बरोबर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचं नाव घेताना “हिंदुहृदय सम्राट “हेच बोलणं विसरले. यावरून समजत कि आम्ही कसे धर्म निरपेक्ष झालो आहोत .जे बाळासाहेब ठाकरे त्यांनी कामावलंय ते आज उद्धव साहेब गमावतील यात काहीच शंका नाही.
     बाळासाहेबांच्या विचारांना सेना कशी काय विसरू शकते याचेच खरे नवल वाटत आहे. तो ठाकरी बाणा दिल्लीलाही हादरून टाकायचं आता तोच ठाकरी बाणा सोनिया गांधींसमोर नतमस्तक होत आहे. आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब असते तर त्यांनी असल पाऊल नक्कीच नसत उचल. किती लाचारी किती तो द्वेष भाजपचा . येणार्या काळात महाराष्ट्र जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हे वाक्य विसरेल.
    धर्मनिरपेक्ष म्हणजे सरळ अर्थ घेतलं तर धर्म न मानने . आज  खर तर कुणीच धर्मनिरपेक्ष असूच शकत नाही जे स्वतःला धर्म निरपेक्ष समजत असतील ते नक्कीच गद्दार आहेत यात काळीमात्र शंका नाही. मित्राने मित्राशी मित्रासारख वागावं, माणुसकीने वागावं ,खरं बोलावे , मुलाने वडिलांचे गुण आत्मसात करावे मुलाचा तो धर्म आहे असो आता धर्मनिरपेक्ष म्हटलं म्हणजे हि मूल्य आपणाकडे नाही असच समजल पाहिजे नाही का? तेव्हा हे धर्मनिरपेक्ष व्यक्ती तुमचा  कधी घात करतील हे सांगता येत नाही करत ती लोक धर्मनिरपेक्ष आहेत.आता पवारच म्हणाल तर पवार सेनेच्या खांद्यावर बंदूक धरून सार काही खेळ खेळेल यात काहीच शंका नसावी. ज्याच्या जवळ धर्मच नाही तो कसला माणूस . धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धत अन आदर्श जीवन जगण्यासाठीचा धर्म आवश्यक आहे.कुठलाही धर्म असेल त्याची काही नियम असतात अन तो धर्म त्यानुसार वागतो अन आपलं आदर्श जीवन जगत असतो .
   तेव्हा सेनेनं आपली चूक वेळीच सुधारावी अन सद्विवेक बुद्धी वापरून निर्णय घ्यावा. आपल्याला धर्म निरपेक्ष व्हायचं आहे कि धर्मच रक्षण करायचं आहे.
तस बघायला गेल तर आता चूक सुधारणेच्या पलीकडे गोष्टी गेल्या आहेत.
     सेनेनं काय गमावलाय मुख्यमंत्री पदाच्या मोहापायी त्याचा सारासार विचार सेनेनं करावं.हे ढेकूण रक्त शोषून घेणारी आहेत अन तुमचंही रक्त शोषून झालं कि तुम्हाला बाजूला सारतील. सेना संपवण्याचा कुटील डाव नक्की असावा.वेगवेळ्या लालसा दाखवून वाघाला घायाळ कारण चालू हि slow reaction सेनेवर चालू आहे अन त्या डावात सेना बरोबर फसली आहे.बरोबर जाळ टाकून वाघाची शिकार झाली आहे. आता हा घायाळ वाघ काय करणार?
हि तर सेनेलाही न समजणारी स्लो reaction आहे. जेव्हा यातून बाहेर पडेल सेना तेव्हा कळेल ? आता आनंद होत आहे पण नंतर मात्र दुखी होणार.
हे सेनासंपवण्याच कटकारस्थान असून त्यात सेना बरोबर फसली आहे. अन बारामती वाले स्क्रिप्ट लिहीत आहे. अन तस सेना वागत आहे.
येणारा काळ सेनेला खूपच अवघड आहे.
जय हिंद भारत माता कि जय    
virendra sonawane www.sargunlekhani.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *