• Tue. Oct 27th, 2020

देवतारी त्याला कोण मारी

Byadmin

Jul 21, 2020

गेली चार महीने लॉकडाऊन आहे अन ह्या परीस्थितीत हातावर काम करणार्या लोकांचे खुप हाल होत आहेत अन प्रौडक्शन बेस कंपनी पण खुपच प्रॉब्लेममध्ये आहेत १५ करोड जनता बेरोजगारीच्य उंबरठ्यावर आहे अन करोना १५० करोड जनतेच्या मानगुटीवर येऊन बसलाय हे दोन भूत कधी जातील अस वाटत नाही त्याला एकच पर्याय WHO चे सर्व नियम पाळणे अन घरुनच काम करणे IT कर्मचार्यांना घरुन काम करण्याची तर मुभा आहे पण तेही जास्त दिवस घरुन काम करु शकत नाही त्यालाही एक साखळी आहेच ही आर्थिक साखळी तुटली की सर्वच परीस्थिती बिघडते भारतातच ही परिस्थिती आहे का तर नाही संपुर्ण जग या करोनाच्या विळख्यात सापडलाय    

    एक कुठतरी कथा ऐकली श्रीकृष्ण अन बलरामाची त्यांना एका भल्यामोठ्या राक्शसाचा सामना करावा लागतो पण तो राक्शस खुपच भयंकर असतो त्याला जेवढेवार केले तेवढा तो मोठा होत जातो पण  अन हे बलरामाच्या लक्शात येत नाही श्रीकृष्णाच्या लगेच लक्शात येत अन त्या राक्शसाचा लांब राहून अन त्याचा सामना न करताच त्याचा सामना करावा अस कृष्णाच्या मनात येत अन त्या राक्शसाचा खात्मा होतो तसाच करोनान राक्शसाचा खात्मा करायचा तर त्याच्यापासून लांबच म्हणजे सोशिअस डिस्टसिंग ठेवून करोना संपवायचा सँनिटायझर लावून हात स्वच्छ धूवूनच करोना संपणार आहे काळजी घेतली तरच फायदा नाहीतर घरी बसूनही मरणार अन बाहेर राहूनही मरणारच       राज्याचाही आर्थिक व्यवहार ठप्प आहे कुठूनच उत्पन्न मिळालं नाही तर काय आर्थिक व्यव्थाच कोलमडून जाईल अन सध्या तरी तशीच परिस्थिती आहे सरकारी कर्मचार्यांचही पगार कपात होत आहे असल्या परिस्थितीत देवच वाचवणार तोच तारणहार नाही तर मरण निश्चितच आहे तेही हाल हाल करुन संपुर्ण जगात  पाप वाढल म्हणून देवानं करोना विषाणू आणला कल्कि आवतार देवान घेतलाच आहे अस म्हणतात तर तो अशा पद्धतीनं बरोबर हिशोब घेवून लोकसंख्या कमी तर करणारच          देवतारी त्याला कोण मारी असच म्हणावं लागेलvirendra sonawane

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *