• Tue. Oct 27th, 2020

अलुमिम किब्बुत्झ

kibbutz

अलुमिम नावाचा अर्थ हिब्रूमध्ये युवा असा होतो.दक्षिण इस्राईलच्या वायव्य भागात नेव्हेव वाळवंटात गाझा पट्टीजवळ अलुमिम हे किब्बुत्झ आहे.सँडोत नेव्हेव प्रादेशिक परिषेदेच्या अधिकार क्षेत्रात येते.अलुमिम किब्बुट्झमध्ये ४८७ लोक राहतात. त्यामध्ये १३५ मुले तर एकूण ९० कुटुंब एकत्र राहतात.यामध्ये वर्गवारी केली तर किब्बुत्झ सदस्य, सैनिक, विद्यार्थी,म्हातारे असा समावेश होतो.किब्बुत्झ सदस्य सैन्यात भरती होण्याअगोदर नौकरी करणे,शिकणे शेती विषयक प्रशिक्षण घेणे  सुनियोजन करून यासाऱ्या गोष्टी करणे.इतर देशाचेही सदस्य किब्बुत्झ मध्ये असतात.  अलुमिम एक पारंपरिक किब्बुत्झ आहे. किब्बुत्झ मध्ये सर्व सदस्यांचे उत्पन्न अलुमिम किब्बुत्झच्या विविध शाखांचे उत्पन्न सारे किब्बुत्झच्या केंद्रीय खात्यात जमा केले जाते.अलुमिमचे कुठलेही खाजगीकरण झालेले नाही. अलुमिम किब्बुत्झचे नियोजन किब्बुत्झच्या सर्व समित्यांद्वारे केले जाते.   अल्युमिम एक यशस्वी किबूतत्झ आहे ज्यांचे अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे.अलुमिम किब्बुत्झमध्ये इतर उद्योगांचाहि विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे.अलुमिम किब्बुत्झव्दारे इतर नागरिकांना प्रशिक्षण दिले जाते.अलुमिम किब्बुत्झमध्ये ४०० नागरिक आपलं जीवन जगत आहेत.अलुमिममध्ये समावेश असलेली पिके* शेती: वाढत्या बटाटे, गाजर, गोड बटाटे, (पारंपरिक आणि ऑर्गेनिक) मिरची, जॉझ्गा, गहू आणि इतर अन्नधान्य पिके * कुक्कुटपालन: मांस साठी कोंबडी बदलता* दुग्धव्यवसाय: दुधासाठी गायी तयार करणे* भाजीपाला भरन्याचे केंद्र:- शेंद्रीय पिकांचे वर्गीकरण करून ती व्यवस्थित भरणे.* Alutech: इस्रायल आणि परदेशात संगणकीकरण आणि नियंत्रण प्रकल्पांची रचना आणि अंमलबजावणी करण्यासाठी संगणक ऑटोमेशन           टेक्नॉलॉजीचा वापर करणे.* अतिथी गृह: आधुनिक धार्मिक कुटुंबातील वातावरणानुसार वर्षभर कार्यरत राहतात* गॅरेज: सर्व्हिंग कार आणि ट्रॅक्टर* दंत चिकित्सालय: अद्ययावत परिसरात उच्च दर्जाचे उपचार प्रदान करणे* बाहेरील रोजगार आणि उद्योजक : त्यांच्या व्यवसायात कारकीर्द बजावण्यासाठी आणि वैयक्तिक व्यवसाय करणार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सदस्यांना सक्षम करणे. *अलुमिम मध्ये साप्ताहिक सांस्कृतिक कार्यक्रम होतात.या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या केंद्रांना बेनेट नेसेट आणि बॅट मिंदीरश अस म्हटलं जात.यामध्ये सभा , उत्सव दैनंदिन कार्यक्रम हि घेतले जातात.इतर सदस्यांबरोबर आपुलकीचे संबध प्रस्तापित व्हावेत यासाठी एकत्रीकरण होते.किबुत्झ अलुमिम त्सेदाका (धर्मादाय) आणि सामाजिक जागरुकता यावर खूप महत्त्वपूर्ण स्थान आहे. एक समुदाय म्हणून आणि वैयक्तिकरित्या अलुमिमचे रहिवासी असंख्य स्वैच्छिक प्रकल्पांमध्ये गुंतलेले आहेतअलुमिममध्ये उन्हाळी शिबीर होतात. खास करून हि शिबीर अंध मुलांसाठी आयोजित केलेली असतात.अलुमिमच्या शोकाकूल कुटुंबीयांची भेट घेणे, एकमेकांच्या दुःखात सहभागी होणे,कर्करोगाच्या रुग्णांना मदत करणे.अलुमिमच्या प्रगतीसाठी केलेल्या उपाय योजनासदस्यांना प्रशिक्षण,वृद्धांसाठी कल्याणासाठी तरतूद* सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना समृद्ध करण्यासाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा विकास* संपूर्ण समुदायातील आणि संपूर्ण इझरायली समाजात सामाजिक कल्याण कार्यक्रमांचे सहभाग आणि परस्पर सहमती* गाझा बॉर्डरवर समृद्ध वाढलेल्या समूहातील सुरक्षेचा आणि आव्हानाला तोंड देण्यासाठी सतत गुंतवणूकवरील सर्व माहिती वेगवेगळ्या वेब साईट वरील आहे. खास करून हिब्रू भाषेतील भाषांतर आहे.भारतातून पण काही नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन अलुमिम असेल किंवा इतर २७० किब्बुत्झ असतील त्यांना भीती द्यायला हव्यात.इस्राईल सारखा मित्र देश भारताला नेहमीच मदद करतो. इस्राईल भारतीय शेतकऱ्यांना नेहमीच प्रशिक्षण द्यायला तयार आहे.भारत सरकारने इस्राईलमधील शेतीविषयक तंत्रज्ञान शेतकऱ्याला कस स्वस्थात मिळेल याकडे बघितलं पाहिजे.धन्यवाद. जय इस्राईल जय भारतVirendra Sonawane Jalgaon8888244883

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *